Tuesday, 4 July 2023

-- -:♦ द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? ♦:- --

-- -:♦ द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? ♦:- --

|| श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर 
|| जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली 

|| द्वारका समुद्रात बुडण्यापूर्वी श्री कृष्णा समवेत संपूर्ण 
|| यदुवंश युद्धात मारला गेला. पौराणिक कथांनुसार 
|| “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची 
|| नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख 
|| कारणे सांगितली जातात.

|| एक म्हणजे गांधारीने श्रीकृष्णाला दिलेला शाप आणि 
|| दुसरी म्हणजे ऋषी मुनींनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला 
|| दिलेला शाप.

|| अर्थात, सदर पौराणिक कथा या काही द्वारकेला 
|| जलसमाधी मिळाल्याचे सबळ पुरावे मानता येत नाहीत. 
|| पण आजही त्या समुद्रात एक शहर आहे, जे अगदीच 
|| महाभारतातल्या द्वारकेशी संबंध दर्शवते. संशोधक आजही 
|| पाण्यात उड्या घेऊन त्या प्राचीन नगरीचे रहस्य 
|| उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

|| असो – तर आपण या कथा सविस्तरपणे जाणून घेऊया.

|| गांधारीने दिला होता यदुवंशाच्या नाशाचा शाप

|| महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा युधिष्ठीर पुन्हा एकदा 
|| सिंहासनावर विराजमान होणार होता, तेव्हा गांधारीने 
|| महाभारताच्या युद्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवून 
|| शाप दिला की,

|| ज्याप्रकारे कौरवांच्या वंशाचा नाश झाला त्याचप्रकारे 
|| यदुवंशाचा सुद्धा नाश होईल.

|| ऋषींनी दिला होता सांबाला शाप

|| महाभारत युद्धानंतर जेव्हा ३६ वे वर्ष सुरु झाले तेव्हा 
|| अनेक वाईट घटना घडू लागल्या आणि द्वारकेत 
|| अपशकुनाचे संकेत मिळू लागले. एक दिवस महर्षी 
|| विश्वमित्र, कण्व, देवर्षी नारद द्वारकेला गेले. तेव्हा यदु 
|| वंशातील राजकुमारांनी त्यांची मस्करी करण्याचे ठरवले.

|| त्यांनी श्रीकृष्णाचा मुलगा सांबा याला स्त्री वेशात 
|| ऋषींसमोर उभे गेले आणि ऋषींना सांगितले की,

|| ही स्त्री गर्भवती आहे, हिच्या गर्भातून काय उत्पन्न होईल ?

|| सर्व ऋषींच्या जेव्हा लक्षात आले की हे तरुण आपला 
|| अपमान करत आहेत, तेव्हा त्यांनी क्रोधीत होऊन शाप 
|| दिला की,

|| श्रीकृष्णाचा हा मुलगा वृष्णी आणि अंधक वंशाच्या 
|| पुरुषांचा नाश करण्यासाठी एक लोखंडाचा मुसळ 
|| निर्माण करेल. त्याच कारणाने तुमच्यासारखे क्रूर आणि 
|| क्रोधी लोक स्वत:च स्वत:च्या संपूर्ण कुळाला नष्ट कराल. 
|| त्या मुसळाच्या प्रभावाने फक्त श्रीकृष्ण आणि बलराम 
|| वाचतील.

|| श्रीकृष्णला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना खात्री 
|| होती की हा शाप खरा ठरणार.

|| ऋषींच्या शापाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी 
|| मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला 
|| समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो 
|| समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भयंकर 
|| अपशकुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वादळे येऊ लागली.

|| नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर 
|| माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री 
|| झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात 
|| असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका 
|| आणि मुंगुसांच्या गर्भातून उंदीर जन्माला येऊ लागले.

|| श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपशकुन बघितले, 
|| तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा 
|| होण्याची वेळ समीप आली आहे.

|| हे सर्व अपशकून आणि सोबतच चालू पक्षाच्या तेराव्या 
|| दिवशी असणारा अमावस्येचा योग अगदी महाभारताच्या 
|| युद्धाच्या वेळी असलेल्या क्षणासारखा होता.

|| गांधारीचा शाप अटळ आहे हे लक्षात आल्यावर 
|| श्रीकृष्णाने द्वारकेतील यदुवंशीयांना प्रभास तीर्थावर 
|| जाण्याची आज्ञा दिली. श्रीकृष्णाच्या आज्ञेचा मन राखून 
|| सगळे राजवंशी समुद्र किनाऱ्यावर प्रभास तीर्थावर येऊन 
|| राहू लागले.

|| प्रभास तीर्थावर असताना एके दिवशी अंधक आणि 
|| वृष्णी वंशजांमध्ये बाचाबाची झाली.

|| तेव्हा सत्यकीने रागाच्या भरामध्ये कृतवर्माचा वध केला. 
|| हे बघून अंधक वंशीयांनी सत्यकीला घेरून त्याचावर 
|| हल्ला केला. सत्यकीला एकटे पाहून श्रीकृष्णाचा पुत्र 
|| प्रद्युम्न त्याला वाचवण्यासाठी गेला.

|| सत्यकी आणि प्रद्युम्न दोघेच अंधक वंशीयांशी लढले, 
|| परंतु त्यांचे बळ कोठेतरी अपुरे पडले आणि अंधक 
|| वंशीयांनी रागाच्या भरात दोघांचा वध केला.

|| आपला पुत्राच्या आणि सत्यकीच्या वधाने क्रोधीत होऊन 
|| श्रीकृष्णाने हाताने जमिनीवरचे गवत उपटले. दुसऱ्याच 
|| क्षणी ते सांबाने निर्माण केलेल्या लोखंडाच्या मुसळामध्ये 
|| परावर्तीत झाले.

|| त्या मुसळामध्ये इतकी शक्ती होती की एका घावात ते 
|| समोरचाचे प्राण हिरावून घेत असे. श्रीकृष्णाने प्रभास 
|| तीर्थावर जाऊन त्या मुसळाने सर्वांचा वध करण्यास 
|| सुरुवात केली.

|| श्रीकृष्णाच्या डोळ्यादेखत सांब, चारुदेष्ण, अनिरुद्ध 
|| आणि गद या महावीरांचा मृत्यू झाला. श्रीकृष्णाने 
|| रागामध्ये इतर सगळ्याच यदुवंशीय वीरांचा वध केला. 
|| तेव्हा त्यांनी आपला सारथी दारूक याला सांगितले की,

|| तू हस्तिनापूराला जा आणि अर्जुनाला या सर्व 
|| प्रकाराबद्दल माहिती दे आणि त्याला द्वारकेला घेऊन ये.

|| दारूकने श्रीकृष्णाची आज्ञा पाळली. इकडे श्रीकृष्ण 
|| पुन्हा द्वारकेला परतले त्यांनी सर्व गोष्ट पिता वासुदेवांना 
|| सांगितली. यदुवंश नष्ट झाल्याचे दु:ख वासुदेवलाही झाले.

|| ही वार्ता वडिलांना ऐकवल्यानंतर श्रीकृष्ण बलरामाला 
|| भेटण्यासाठी जंगलामध्ये गेले. त्यांनी पाहिले कि 
|| बलरामाने आधीच समाधी घेतली आहे. व्यथित झालेल्या 
|| श्रीकृष्णाने देखील अवतार कार्य संपुष्टात आणण्याच्या 
|| उद्देशाने स्वयं समाधी घेतली आणि त्याच अवस्थेत ते 
|| जमिनीवर पडून राहिले.

|| ज्यावेळी श्रीकृष्ण समाधीमध्ये होते, त्याचवेळी जरा 
|| नावाचा एक शिकारी शिकार करण्यासाठी आला त्याने 
|| लांबूनच हरीण समजून श्रीकृष्णाला बाण मारला.

|| बाण मारल्यानंतर तो शिकारी शिकार पकडण्यासाठी पुढे 
|| गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णाला बघून त्याला पश्चाताप 
|| झाला.

|| तेव्हा –

|| “हे सर्व विधिलिखित असून, माझा अवतार असाच 
|| संपणार होता…”

|| हे सांगून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि ते 
|| स्वर्गात निघून गेले.

|| इकडे दारूक श्रीकृष्णाचा निरोप घेऊन हस्तिनापुरात 
|| दाखल झाला. यदुवंश नष्ट झाल्याची वार्ता ऐकून अर्जुन 
|| त्वरित द्वारकेकडे रवाना झाला. अर्जुन जेव्हा द्वारकेला 
|| आला, तेव्हा तेथील भयावह परीस्थिती बघून त्याला खूप 
|| दु:ख झाले.

|| वासुदेवाने सर्व नगरवासीयांना आपल्या बरोबर घेऊन 
|| जाण्याची विनंती अर्जुनाला केली. कारण श्रीकृष्णाचे 
|| अवतार कार्य संपुष्टात आले होते आणि सोबत द्वारकेचा 
|| देखील अंत होणार होता.

|| अर्जुनाने वासुदेवाची ही विनंती मान्य केली आणि 
|| आजपासून सातव्या दिवशी इंद्रप्रस्थासाठी आपण रवाना 
|| होऊ अशी घोषणा केली. द्वारकेतील सर्व नगरवासीयांनी 
|| अर्जुनाची आज्ञा शिरसावंद्य मानून प्रस्थानाची तयारी सुरु 
|| केली.

|| दुसऱ्या दिवशी सकाळी वासुदेवानी आपल्या प्राणाचा 
|| त्याग केला. अर्जुनाने विधीपूर्वक त्यांचे अंतिम संस्कार 
|| केले. वासुदेवाच्या पत्नी देवकी, भद्रा, रोहिणी या सुद्धा 
|| वासुदेवाच्या चितेवरून सती गेल्या. त्यानंतर अर्जुनाने 
|| प्रभास तीर्थामध्ये मारल्या गेलेल्या सर्व यदुवंशीयांचे सुद्धा 
|| अंतिम संस्कार केले.

|| सातव्या दिवशी अर्जुन आपल्या नातेवाईकांना आणि 
|| नगरवासीयांना आपल्याबरोबर घेऊन इंद्रप्रस्थाकडे गेला.

|| सर्वजण द्वारकेमधून बाहेर निघताच श्रीकृष्णाची प्राणप्रिय 
|| द्वारका नगरी हळूहळू समुद्रात बुडू लागली. ते दृश्य पाहून 
|| सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पुढील काही क्षणातच 
|| द्वारकेला जलसमाधी मिळाली. 

|| बुधवार :--- { ०५ / ०७ / २०२३ } !............

No comments:

Post a Comment