Sunday, 29 January 2023

व्यायाम

ह्या कडव्यातून तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्त्वच पटवून दिले आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यायामाने हा आळस दूर होतो. अंगात तरीतरी येते. कामातील आपला उत्साह वाढतो. व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे.

आपल्या मोबाईलची battery संपली असता, मोबाईल बंद पडतो. तसेच आपल्या शरीराचे आहे मित्रानो. शरीराला व्यायाम असेल तर आपली हालचाल मंदावते.

अगदी छोटी छोटी कामे केली असता ही दम लागतो आणि हळू हळू आपले शरीर हे आजारांचे घर बनते. हे सगळं टाळायच असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामामुळे आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते ती कशी ते आपण पाहू या.  

वजन कमी होण्यास मदत होते

आजकाल वजनवाढ ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन वाढले की आजार बळावतात. फास्टफूडमुळे झपाट्याने वजन वाढते. अशावेळी शरीराला व्यायामाची गरज आहे.

व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. हिट वर्कआउट, चालणे, झुंबा यामुळे लवकर कलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते. 

हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते

व्यायामामुळे हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग, डंबेल्सचा वापर करून व्यायाम  यामुळे तुमची हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो.

वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. 

हृद्य व्यवस्थित काम करावे यासाठी

आजकाल चुकीच्या जीवनपद्धतीमुळे कमी वयात देखील हार्ट attackचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा आहार, फास्टफूडचे  जास्तीत जास्त सेवन, यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे काम ही सुरळीत चालू राहते. त्यामुळे हृद्य जपण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. 

मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते

भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

नियमित व्यायामाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे माधुमेहाचा धोका संभवतः नाही किंवा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

आर्युर्मान तसेच शारीरिक क्षमता वाढते

व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती | काम करण्याची || असे संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कवितेत सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, व्यायाम केल्याने शरीराला तंदुरुस्ती मिळते. काम करण्याची स्फूर्ती मिळते. 

आपल्याला अधिक कार्यक्षम वाटते. त्यामुळे शारीरक काम करताना थकवा जाणवत नाही. शारीरिक क्षमता वाढते तसेच योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आपले आयुष्यमान देखील वाढते.

वाईट जीवनशैलीचा आपल्या शरीरावर वाईटच परिणाम होत असतो. त्यामुळे व्यायाम आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे. 

मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी

व्यायाम केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी असेल तर आपले मन देखील निकोप राहते.

मनात वाईट विचार येत नाही. नियमित व्यायाम केल्याने ताण, तणाव, डिप्रेशन या सारख्या मानसिक आजारापासून दूर राहता येते. 

मेंदूचे काम सुरळीत चालण्यासाठी

आपल्या मेंदूचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होतो.

यामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराची ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते. 

आजारांवर मात

आजकाल मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा,  गुडघेदुखी हे खूप सामान्य आजार झाले आहेत. परंतु हे शरीरासाठी चांगले नाहीत. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे.

यासोबतच अपचन, संधिवात यासारखे आजार देखील होण्यास मदत होते. व्यायामामुळे चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या फुफ्फुसाची क्षमत वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने शारीरिक तसेच मानसिक आजार दूर ठेवता येतात Importance Of Exercise In Marathi. 

व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या अशा की – व्यायाम शक्यतो सकाळच्या वेळी करावा. व्यायाम रिकाम्या पोटी तसेच जेवण केल्यावर लगेच करू नये. शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडावा.

व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत – यामध्ये एरोबिक व्यायाम, अनेरोबिक, स्ट्रेचिंग आणि Balancing याचा समावेश आहे. या चार व्यायाम प्रकारा अंतर्गत योगा, पोहणे, नाचणे, जिम, चालणे, पळणे अशा व्यायामांचा समावेश होतो. 

व्यायामाबरोबरच फळेही आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

निष्कर्ष

Importance Of Exercise In Marathi आजच्या आधुनिक जीवानात माणसाने वेगवेगळे शोध लावून आपले जीवन सोयीस्कर बनवले आहे. माणसाची कष्टाची कामे कमी झाली आहेत.

यामुळे हालचाल कमी होऊन याचा शरीरावर परिणाम होत आहे. कमी वयातच वेगवेगळे आजार माणसाला होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे. 

आज आपण पाहिले की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. 


Thursday, 26 January 2023

आपण खरोखर कोण आहात

आपण खरोखर कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा? अध्यात्मिक मार्गाचा उद्देश तुमच्या खऱ्या स्वभावाची समज प्रदान करणे हा आहे. तुम्ही शरीर, मन किंवा बुद्धी नाही. तू शाश्वत, दिव्य, शुद्ध रूप आहेस..! ज्यांनी आपल्या इच्छेला पूर्णविराम दिला ते धन्य. म्हणजेच ज्या जीवांची वृत्ती भौतिक जगतापासून, बौद्धिक भ्रमांपासून मुक्त आहे आणि आत्म-जागरणासाठी तयार आहे, त्यांचे जीवन खरोखर धन्य आहे. अध्यात्मिक विवेक निर्माण करून मनुष्य अनंत शक्ती आणि अनंत उर्जेचा मालक बनू शकतो., अध्यात्मिक प्रवास म्हणजे निसर्गाचा प्रवास. शुभ-दिव्यत्व आणि जीवनाच्या यशाची सर्व सूत्रे केवळ अध्यात्मात सामावलेली आहेत. अध्यात्म हा निसर्गाचा प्रवास आहे. मानवामध्ये अस्तित्वात असलेली शाश्वत महाशक्ती हे सर्वत्र मन-शावक, पूर्ण-आनंदाचे रूप आहे. निसर्गाचे हे सार्वत्रिक रूप हे त्याचे एकमेव धार्मिक परिणाम आहे, सनातनचे धार्मिक परिणाम म्हणजे सनातन. परमात्मा सर्व बाबतीत पूर्ण आहे, म्हणून त्याच्यामध्ये अपूर्णता नाही. या सत्याचे अनावरण म्हणजे - अध्यात्म. अध्यात्म हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहे. मानवी जीवन ही दैवी देणगी आहे. त्यामुळे त्याच्या खऱ्या स्वरूपाची प्राप्ती आणि जीवनाच्या उद्देशाची पूर्तता हे जीवनाचे ध्येय असले पाहिजे; हा अंतिम प्रयत्न आहे! ज्याप्रमाणे सोन्यासारख्या धातूंची अशुद्धता अग्नीत तापवून नष्ट होते, त्याचप्रमाणे भगवंताची कथा, सत्संग इत्यादी श्रवण केल्याने इंद्रियांचे दोष दूर होतात. देवाची कथा मानवी जीवनातील दु:ख दूर करते. म्हणूनच जर दुःखापासून मुक्ती असेल तर भगवंताच्या चरणी त्याची कथा ऐकण्यात मन एकाग्र करा. फक्त देवच सर्वांचे भले करतो. तो सर्वांचा  मित्र आहे. साधक हाच जो स्वतःमध्ये विचारांचा गर्भ तयार करतो. साधना करा आणि दररोज निरोगी विचारांना जन्म द्या. गरोदरपणात आई जे विचार मनात रुजवते, तेच विचार मुलाच्याही मनात येतात. म्हणूनच माणसाने नेहमी उच्च विचार आणि दैवी भक्तीमध्ये मग्न असले पाहिजे. त्यांनी ध्रुव चरित्राच्या कथेत म्हटले आहे की, ध्रुव लहानपणापासूनच भक्तीत मग्न होता. माणसाला आपल्या मुलांमध्ये देव आणि देवाप्रती भक्ती ठेवायला शिकवले पाहिजे. भागवत कथा माणसाच्या सर्व दुःखांचा नाश करते. अट अशी आहे की आपण ही मोक्षकथा खऱ्या अंतःकरणाने ऐकू, नंतर ध्यान करू आणि आपल्या जीवनात सद्गुण आत्मसात करू.ते घालू नका.  भागवत कथा हा पाचवा वेद आहे आणि तो परमात्म्याचे रूप आहे.  या जगाच्या प्रत्येक कणात परमेश्वराचा वास आहे. ती मिळवायची असेल तर सत्कर्म करा, सत्संगात सहभागी व्हा, सुमिरन करा. भागवत कथा ऐकल्याने भगवंताच्या चरणी प्रेम तर वाढतेच, सोबतच भागवत भक्तीही प्राप्त होते, म्हणून भगवंताची कथा श्रवण करत राहिले पाहिजे. भगवंताच्या भक्तीनेच मानवता प्राप्त होते, म्हणूनच भागवत कथेत मानवी जीवन यशस्वी करण्याचे सामर्थ्य आहे.आणि ते ऐकून आपण पापापासून मुक्त होतो. श्रीमद्भाववतगीतेला अध्यात्माचा दिवा म्हटले आहे, त्याचे फलित अध्यात्म आहे. अध्यात्माचा अर्थ म्हणजे आपल्यातील चैतन्य घटक जाणून घेणे आणि पाहणे, म्हणजे स्वतःबद्दल जाणून घेणे किंवा आत्म-जागरूक असणे. गीतेच्या आठव्या अध्यायात स्वतःच्या स्वरूपाला म्हणजेच आत्म्याला अध्यात्म म्हटले आहे. “परमम् सभावोध्यात्मुच्यते …” हे सर्वज्ञात आहे की आत्मा हा परमात्म्याचा एक भाग आहे. अध्यात्माची अनुभूती सर्व प्राणिमात्रांमध्ये सारखीच असते. स्वत:चा शोध प्रत्येकजण जे काही करत असेल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे, भगवंताच्या असीम प्रेमाचा एक थेंब मानवामध्ये आढळतो, ज्यामुळे आपण त्याच्याशी एकरूप होतो, परंतु काही काळानंतर तो नाहीसा होतो आणि आपण निराश होतो. देव सर्वात दयाळू आहे जो आपल्या छोट्या प्रयत्नांनी वितळतो. अध्यात्म हे स्वतःच्या स्वभावाकडे परतण्याच्या प्रवासाचे नाव आहे. जिथे शांतता, आनंद आणि कायमचे समाधान आहे. अध्यात्म आंतरिक उर्जा जागृत करते, स्वतःची अग्नी. विषम आणि प्रतिकूल परिस्थितीत मोठे कसे व्हायचे ते सांगते? स्वतःचे बाह्य विकास म्हणजे विज्ञान आणि आंतरिक विकास म्हणजे अध्यात्म. संपूर्ण वसुधाला एक कुटुंब मानणे हीच अध्यात्माची प्रेरणा आहे. बाह्य जगात जगाला एका सूत्रात बांधण्याचा आधार विज्ञानाने मांडला आहे, तर अंतरंगात तोच उद्देश अध्यात्माने पूर्ण होतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे. अध्यात्म ही जीवनाची नैसर्गिक मागणी आहे. जेव्हा ते पूर्ण होऊ लागते, तेव्हा अचानक आनंद, उल्हास, जीवनात धन्यता, उत्सव, स्थिरता, आनंद इत्यादी जाणवतात. ज्याच्या आगमनावर कोणताही गोंधळ आणि भीती नाही,  मग संघर्षही कुठे राहतो? अध्यात्म म्हणजे तोटा-लाभ, जन्म-मृत्यू, कीर्ती-अपयश या द्वैतांच्या वर जाणे. जो चैतन्याला प्रासादिक बनवतो, तेच अध्यात्म. अध्यात्म हे निसर्गाचे नाव आहे. जो आपल्याला निसर्गाकडे, आपल्या अस्तित्वाकडे, घेऊन जातो, त्यालाच 'अध्यात्म' म्हणतात. महापुरुषांची शिकवण नीट कशी ऐकायची हे कळले तर जीवनातील शंका आपोआपच संपतील. म्हणून आत्म-तत्त्वाचे तत्त्वज्ञान, प्रबोधन आणि उत्थान यासाठी चार पायऱ्या आवश्यक आहेत - आत्मनिरीक्षण, आत्म-सुधारणा, आत्म-निर्मिती आणि आत्म-विकास., ,

स्त्रीयांचे अलंकार आणि महत्व....


स्त्रियांनी अलंकार धारण करण्याचे महत्त्व आणि अलंकार धारण केल्यामुळे होणारे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून करून घेऊ या. विधवा स्त्रियांनी अलंकार का घालू नये, याविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.

१. स्त्रियांनी अलंकार परिधान करण्याचे महत्त्व आणि लाभ
अ. स्त्रियांनी अलंकार परिधान करणे, म्हणजे स्वतःतील देवत्व जागृत करणे
१. अलंकारांमुळे स्त्रीच्या शरिरात असलेल्या तेजतत्त्वरूपी आदिमायेचे आणि आदिशक्तीचे प्रकटीकरण होते.

२ शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे देवतेच्या शक्तीरूपाची केलेली पूजा असणे : स्त्री हीदेवतेच्या अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. शास्त्रीय पद्धतीने अलंकार परिधान करणे, म्हणजे त्या शक्तीरूपाची केलेली पूजा आहे. अलंकारांद्वारे स्वतःमध्ये शक्ती प्रकट करून स्वतःसह इतरांनाही तिचा लाभ करून देणे, हे तिचे कार्य आहे.’

३. अलंकार घातलेली स्त्री शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ असणे : ‘अलंकार घातलेल्या स्त्रीकडे पाहिल्यावर पूज्यभाव निर्माण होतो. त्यामुळे स्वतःमधील आणि इतरांचीही शक्ती जागृत होते. हे एक लहानसे शक्तीजागृतीचे पूजनीय पीठ आहे आणि देवतेचे सतत स्मरण करून देणारी प्रतिमा आहे. स्थुलातील पूर्णत्वाच्या दिशेची ही वाटचाल सगुण उपासनेतून निर्गुणाकडे घेऊन जाणारी आणि निर्गुणाची अनुभूती देणारी आहे.’

आ. स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर करणे
‘अलंकार परिधान करण्यामागे जिवाचा भाव असेल, तर जीव असत् कडून सत् कडे जातो. त्यामुळे प्रत्येक स्त्री-जिवाने संस्कृतीचे पालनकरून स्व-उन्नती घडवून आणण्यासाठी अलंकारांचा वापर केला पाहिजे.

इ. हिंदु धर्माने स्त्रीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्यातील शक्तीतत्त्व टिकून रहाण्यासाठी केलेली अलंकारांची रचना
१. ‘विशुद्धचक्र : हे गळ्यात कंठमणी घालून जागृत ठेवले जाते.

२. अनाहतचक्र : हे मंगलसूत्राच्या वाट्यांच्या पोकळीतील तेजस्वरूप लहरींच्या स्पर्शाने जागृत ठेवले जाते.

३. नाभीप्रदेश : मेखलेचा, तसेच कांचीचा बंध नाभीप्रदेश, तसेच कटिबंधप्रदेशाला शक्तीतत्त्वाच्या बळावरकार्य करण्यास उद्युक्त करणारा असतो.

४. पाय : पायांतील पैंजणाचा नाद आणि जोडवी पाताळातून येणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून स्त्रीचे रक्षणकरतात.
वरील उदाहरणांतून हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येते.’

ई. अलंकारांमुळे स्त्रीचे रज-तमात्मक लहरींपासून रक्षण होणे
‘स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. स्त्री हीमूलतःच रजोप्रवृत्तीची असल्याने तिच्या अंगावर असणारे अलंकार तिचे प्राकृतिक स्वरूपात वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या भ्रमणातून उत्पन्न होणार्‍या ऊर्जेपासून रक्षण करतात. प्रत्येक अलंकार स्त्रीला कवचरूपी (चिलखतरूपी) संरक्षण देतो; कारण स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त संवेदनशील असल्याने ती वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींना चटकन प्रतिसाद देते; म्हणून पूर्वापार अलंकार वापरून तिचे संरक्षणकेले जाते.

उ. अलंकारांमुळे वाईट शक्तींना प्रतिबंध होण्यास साहाय्य होणे
१. अलंकारांमुळे त्या त्या अवयवाभोवती चैतन्याचा आकृतीबंध बनतो आणि वाईट शक्तींना पुढे प्रवेश करणे कठीण होते, उदा. पायांत पैंजण अन् हातांत बांगड्या घातल्याने वाईट शक्तींना पाय आणि हात यांद्वारे शरिरात सहज प्रवेश करता येत नाही.

२. आजकाल लग्न झालेल्या काही स्त्रियांच्या मनात ‘हातांत पाटल्या-बांगड्या घालू नयेत; रात्री झोपतांना बांगड्या आणि मंगळसूत्र काढून ठेवावे’, असे विचार येतात. असे विचार वाईट शक्तींनीच स्त्रियांच्या मनात घातलेले असतात. त्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांवर आक्रमण करणे सोपे जाते. प्रत्यक्षात पाटल्या, बांगड्या आणि मंगळसूत्र यांमुळे हात अन् गळा या अवयवांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

३. काही स्त्रियांना घाम येत नसतांना गळ्यावर पुरळ उठते आणि ‘मंगळसूत्र घातल्याने पुरळ उठले आहे’, असे वाटून त्या सोन्याचे मंगळसूत्र काढून खोटे (सोने न वापरता बनवलेले आणि वजनाने हलके असलेले) मंगळसूत्र घालतात. याचाही वाईट शक्तींना लाभ होतो. मंगळसूत्रामुळे गळ्याचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.

४. वाईट शक्तींचा त्रास होत असतांना स्त्रियांना अंगावरील अलंकार काढावेसे वाटतात. पूर्वी राण्यांना राग आल्यावर त्या क्रोधागारात जाऊन अंगावरील सर्व अलंकार काढून टाकत असल्याचेही आपण वाचले आहे.’

ऊ. सोन्याच्या आणि चांदीच्या अलंकारांमुळे वाईट शक्तींपासून रक्षण होणे
ऊ १. अलंकारातील सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमणपरतवले जाणे
‘स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या शक्तींचा लवकर परिणाम होतो अन् तो जास्त काळ टिकतो. अलंकार बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सोने आणि चांदी या धातूंमुळे त्या त्या प्रकारच्या वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते अन्त्रासदायक लहरींपासून स्त्रीचे रक्षण होते. स्त्रियांतील सात्त्विकता वाढावी आणि वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षणव्हावे, यासाठी स्त्रियांनी अलंकार घालावेत.

ऊ २. शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी कटीच्या (कमरेच्या) वरच्या भागातीलअलंकार सोन्याचे असणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) वरच्याभागात घालायचे अलंकार सोन्याचे असतात. तेजाचे संवर्धन करणार्‍या सोन्याचा वापर भूमीपासून वरिष्ठस्तरात (टीप १) कार्य करणार्‍या शक्तीमान वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी केला गेल्यामुळे देहाच्यामध्यम आणि वरिष्ठ स्तरांतील सर्व दागिने सोन्याचे असतात. (मणिपूरचक्रापासून वरच्या चक्रांमध्ये चांगली शक्ती ग्रहण करण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते; म्हणून नाभीपासून वरच्या भागांवर तेज प्रक्षेपित करणारे सोन्याचे अलंकार धारण केले जातात.) सोन्यामुळे त्या त्या पट्ट्यातील क्रियाशक्तीरूपी वरिष्ठ वाईट शक्तींचे आक्रमण परतवले जाते.

ऊ ३. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या कनिष्ठ लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीभागाच्या(कमरेच्या) आणि पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा वापर केला जाणे
सर्वसाधारणपणे स्त्रियांच्या अलंकारांपैकी कटीपासून (कमरेपासून) खालच्या भागात घालायचे अलंकार चांदीचे असतात. चांदीची रजोगुणी चैतन्ययुक्त इच्छालहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने त्या त्या कार्याला पूरक अशा धातूचे अलंकार त्या त्या अवयवासाठी वापरले जातात. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या पृथ्वी आणि आप तत्त्वयुक्तत्रासदायक लहरींपासून रक्षण होण्यासाठी कटीप्रदेशाच्या अन् पावलांच्या अलंकारांमध्ये चांदीचा विशेषत्वानेवापर केला जातो.’

ए. सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रियांना त्यांच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे माध्यम
१. ‘कुंकू, मंगळसूत्र, कंकण, जोडवी आदी घटकांच्या साहाय्याने रजोगुणाच्या सामर्थ्यावर विवाहित स्त्री अल्पकालावधीत पुरुषप्रधान शिवस्वरूप कर्तृस्वरूपाशी एकरूप होऊ शकते; म्हणून स्त्रीतील क्रियाशीलत्व जागृतकरून पतीच्या कर्तृभावात त्याला पुरेपूर साहाय्य करून कृती आणि कर्म यांची रजोगुणाच्या साहाय्याने योग्यसांगड घालण्यासाठी विवाहित स्त्रियांना त्या त्या अलंकारांचे कर्मबंधत्व घातले गेले.

२. स्त्रीला सौभाग्यालंकारांच्या माध्यमातून होणार्‍या तेजदायी लहरींच्या स्पर्शातून तिच्यातील पातिव्रत्याचीसतत जाणीव करून देण्याचे प्रयोजन केले गेले.

३. सौभाग्यालंकारांच्या बाह्य भानातून समाज एकपत्नीत्व आणि पातिव्रत्याचे संगोपन करून स्वैराचारापासूनमुक्त राहील, अशी योजना करणे कलियुगात अपरिहार्य ठरले.

४. सौभाग्यालंकार म्हणजे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासून रक्षण करण्याचा केलेला प्रयत्न :कलियुग हे रज-तमप्रधान असल्याने हा काळ स्वैराचाराला अनुकूल आणि साधनेला प्रतिकूल असा आहे. यायुगात स्त्रीरूपी पवित्रतेला किंवा सौभाग्यशीलतेला अलंकाररूपी तेजस्वितेचे कोंदण घातलेले आहे. यातेजस्वितेच्या बळावर तिच्या शीलाचे रक्षणही होते. सौभाग्यवती स्त्री ही मंगळसूत्र, कंकण, तसेचकुंकू या सौभाग्यालंकारांनी संरक्षित केलेली असल्याने तिला एक प्रकारे अनिष्ट शक्तींच्या भुक्त दृष्टीपासूनविभक्त करण्याचा प्रयत्न कलियुगात केला गेला आहे.’

२. विधवांनी अलंकार परिधान का करू नयेत ?
अ. सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, तेव्हा वैराग्य भावनेचा उदय होतो !
‘ज्या वेळी सौभाग्यरूपी धारणेचा लय होतो, त्या वेळी खर्‍या अर्थाने स्त्रीतील उत्पत्ती विषयक तेजधारणेने नटलेले बीज लोप पावते आणि त्याच ठिकाणी वैराग्य भावनेचा उदय होतो. तेजस्वीतेचा लय होणे, म्हणजेच अलंकाररूपी शृंगारत्व त्यागून अलंकार विरहित वैराग्य जीवनास आरंभ करणे.

आ. स्त्रीमध्ये वैराग्य भाव लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकारत्यागाची संकल्पना दृढहोणे
हा वैराग्यभाव स्त्रीमध्ये लवकर निर्माण होण्यासाठी कलियुगात अलंकार त्यागाची संकल्पना दृढ झाली. पूर्वीच्या काळी स्त्रिया तेजरूपी साधनेने परिपक्व असल्याने त्यांच्यात हळूहळू साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला वैराग्यभाव निर्माण होत असे; परंतु आता साधनेच्या अभावामुळे अलंकार त्यागातून विधवा स्त्रीमध्ये वैराग्य भावाची निर्मिती होऊन तिचा लवकर मोक्ष प्राप्तीकडे प्रवास व्हावा, या उद्देशाने बाह्यांगाने विधवा स्त्रीसाठी अलंकार त्याग स्वरूपाची आवश्यकता भासली. अलंकारांच्या स्पर्शाने स्त्रीतील रजोगुण सतत जागृत अवस्थेत रहातो, तर अलंकार विरहिततेच्या भावनेतून रजोगुणाचा लय होऊन वैराग्य भावलवकर निर्माण होण्यास साहाय्य होते.’

३. व्यक्तीमत्त्वानुसार अलंकारांची निवड
‘व्यक्ती आपल्या व्यक्तीमत्त्वाला पूरक अशा अलंकारांची निवड करते. सात्त्विक व्यक्ती सात्त्विकअलंकारांची, राजसिक व्यक्ती राजसिक अलंकारांची, तर तामसिक व्यक्ती तामसिक अलंकारांची निवड करते. सात्त्विक अलंकारांकडे पाहून भाव, चैतन्य, आनंद किंवा शांती यांची अनुभूती येते. राजसिक अलंकारांतून शक्तीची अनुभूती येते, तर तामसिक अलंकारांकडे पाहून त्रास होतो.’

Wednesday, 25 January 2023

जन्म मृत्यू

जन्म मृत्यू चे चक्र अव्याहत....सत्पुरुष
             
जन्म-मृत्यू-जन्म हे जे अव्याहतपणे चक्र सुरू असते, त्या चक्रातून फिरण्याची जी शिक्षा प्रत्येक जीवाला भोगावी लागते, त्यातून साधक-भक्ताची निश्चितपणे सुटका होते.  ह्यावर आपले* 
*चिंतन-भारले भाष्य करताना श्रीज्ञानदेव म्हणतात, ऊसापासून साखर करतात, परंतु साखरेपासून पुन्हा ऊस निर्माण करता येईल का? दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी; लोण्यापासून तूप ही प्रक्रिया, परंतु त्या तुपाला पुन्हा घुसळून दूध निर्माण करता येईल का? ही अशक्य गोष्ट आहे. नदी उगमापासून सुसाट सुटते, वाटेतले सर्व अडथळे दूर करीत, समुद्राला जाऊन मिळण्यासाठी. ती समुद्र होऊन जाते. एकदा समुद्राला आपले अस्तित्व अर्पण केल्यावर नदी कधी तरी माघारी उगमापाशी येणे शक्य आहे का? ते शक्य झाले तरच हरीचे दास मोक्षपद न मिळवता पुन्हा माघारी जन्म घेतील. जे परम भक्त विविध प्रकाराने देवाची भक्ती करतात, नवविधा भक्तीच्या नऊ पायर्‍या अथक साधनेच्या बळावर पार करतात, ते भाग्यवान जीव हा भवसागर पार करून जातात. कापूर हा सुगंध अर्पण करतो. कापूरापासून शाई होत नाही. परंतु कापूराच्या शाईने जर अभंग लिहिता आले असते तर आपली जी छाया पडते ती आपल्याला आपल्याच हाताने चक्क उचलून घेता येईल. पण हे अशक्य आहे. श्रीज्ञानदेव म्हणतात की, ‘परमेश्वराची जे आर्त होऊन उपासना करतील, अखंड नामस्मरणात अष्टौप्रहर दंग होऊन त्याच्याच नामाच्या कुशीत आनंदात राहतील ते ह्या मर्त्य विश्वात कदापिही जन्म घेणार नाहीत.’ ज्ञानदेव महाराज खात्रीपूर्वक सर्वच परम भक्तांना असं वचन देतात.
शेत नांगरण्यापूर्वी ते जाळतात. आधीच्या पिकाचे जे शिल्लक असेल ते जाळतात. तसे, माझ्या प्रापंचिक वासना सगळ्या नाहीशा केल्याशिवाय परमात्मा येणार नाही. यासाठी महाराज दोन मार्ग सांगावयाचे. एक मार्ग- त्या प्रपंचाला आगच लावून टाकायची, पण ही फार मोठ्या माणसांची कामे आहेत. दुसरा मार्ग जर असेल तर ते शेत भगवंताच्या मालकीचे करावयाचे. मग सद्गुरूची खुबी अशी आहे म्हणाले की तो ते शेत न जाळता बरोबर करून घेईल. हे त्याचे काम आहे. पण मग त्याला तू अमुक कर म्हणून सांगता येणार नाही. ज्ञानामध्ये विरक्तीशिवाय उपाय नाही म्हणतात; परंतु भक्तीमध्ये "हे तुझे आहे तू सांभाळ" असे म्हणल्यानंतर त्याला काय करावयाचे ते तो करील. प्रापंचिक मनुष्य काही पूर्व पुण्यायीने सत्पुरुषाजवळ जातो. त्याला देव नको असतो, प्रपंच व्यवस्थित हवा असतो. हा सत्पुरुष काय करतो तर, एखादीजमीन मुरुमानी भरलेली असते. शेतकरी जसे दोन चार फूट खोल मुरूम काढतो, त्यात नवी माती घालतो, खत घालतो आणि पीक काढतो, तसे हा सत्पुरुष हळूहळू त्याच्या मनातला प्रपंच बाजूला करतो, त्यात भगवंताच्या नामाचे बीज पेरतो आणि पीक काढतो. त्याचे पीक बेताचेच आले तरी आल्याशिवाय राहात नाही. ही त्या सत्पुरुषाची कर्तबगारी आहे.

“सकळ जन हिताय 
श्री स्वामी समर्थाय नमो नमः” 
अवधुतचिंतन जय श्री गुरुदेव दत्त 
दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंमरा 
ब्रम्हां विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Il अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll
Il ॐ श्री स्वामी समर्थ ll