ह्या कडव्यातून तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्त्वच पटवून दिले आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. व्यायामाने हा आळस दूर होतो. अंगात तरीतरी येते. कामातील आपला उत्साह वाढतो. व्यायाम आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे.
आपल्या मोबाईलची battery संपली असता, मोबाईल बंद पडतो. तसेच आपल्या शरीराचे आहे मित्रानो. शरीराला व्यायाम असेल तर आपली हालचाल मंदावते.
अगदी छोटी छोटी कामे केली असता ही दम लागतो आणि हळू हळू आपले शरीर हे आजारांचे घर बनते. हे सगळं टाळायच असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामामुळे आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते ती कशी ते आपण पाहू या.
वजन कमी होण्यास मदत होते
आजकाल वजनवाढ ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन वाढले की आजार बळावतात. फास्टफूडमुळे झपाट्याने वजन वाढते. अशावेळी शरीराला व्यायामाची गरज आहे.
व्यायामामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. हिट वर्कआउट, चालणे, झुंबा यामुळे लवकर कलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
हाडे मजबूत आणि बळकट होण्यास मदत होते
व्यायामामुळे हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग, डंबेल्सचा वापर करून व्यायाम यामुळे तुमची हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो.
वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते.
हृद्य व्यवस्थित काम करावे यासाठी
आजकाल चुकीच्या जीवनपद्धतीमुळे कमी वयात देखील हार्ट attackचे प्रमाण वाढले आहे. चुकीचा आहार, फास्टफूडचे जास्तीत जास्त सेवन, यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
व्यायाम केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयाचे काम ही सुरळीत चालू राहते. त्यामुळे हृद्य जपण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे.
मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
भारतात मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
नियमित व्यायामाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे माधुमेहाचा धोका संभवतः नाही किंवा मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आर्युर्मान तसेच शारीरिक क्षमता वाढते
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती | काम करण्याची || असे संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कवितेत सांगितले आहे. याचा अर्थ असा आहे की, व्यायाम केल्याने शरीराला तंदुरुस्ती मिळते. काम करण्याची स्फूर्ती मिळते.
आपल्याला अधिक कार्यक्षम वाटते. त्यामुळे शारीरक काम करताना थकवा जाणवत नाही. शारीरिक क्षमता वाढते तसेच योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आपले आयुष्यमान देखील वाढते.
वाईट जीवनशैलीचा आपल्या शरीरावर वाईटच परिणाम होत असतो. त्यामुळे व्यायाम आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे.
मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी
व्यायाम केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी असेल तर आपले मन देखील निकोप राहते.
मनात वाईट विचार येत नाही. नियमित व्यायाम केल्याने ताण, तणाव, डिप्रेशन या सारख्या मानसिक आजारापासून दूर राहता येते.
मेंदूचे काम सुरळीत चालण्यासाठी
आपल्या मेंदूचे काम सुरळीत चालू राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. मेंदूला सुरळीत रक्तपुरवठा होतो.
यामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. शरीराची ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते.
आजारांवर मात
आजकाल मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, गुडघेदुखी हे खूप सामान्य आजार झाले आहेत. परंतु हे शरीरासाठी चांगले नाहीत. या आजारांपासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे.
यासोबतच अपचन, संधिवात यासारखे आजार देखील होण्यास मदत होते. व्यायामामुळे चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. आपल्या फुफ्फुसाची क्षमत वाढते. त्यामुळे नियमित व्यायाम केल्याने शारीरिक तसेच मानसिक आजार दूर ठेवता येतात Importance Of Exercise In Marathi.
व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या अशा की – व्यायाम शक्यतो सकाळच्या वेळी करावा. व्यायाम रिकाम्या पोटी तसेच जेवण केल्यावर लगेच करू नये. शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम करावा. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडावा.
व्यायामाचे प्रकार
व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत – यामध्ये एरोबिक व्यायाम, अनेरोबिक, स्ट्रेचिंग आणि Balancing याचा समावेश आहे. या चार व्यायाम प्रकारा अंतर्गत योगा, पोहणे, नाचणे, जिम, चालणे, पळणे अशा व्यायामांचा समावेश होतो.
व्यायामाबरोबरच फळेही आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.
निष्कर्ष
Importance Of Exercise In Marathi आजच्या आधुनिक जीवानात माणसाने वेगवेगळे शोध लावून आपले जीवन सोयीस्कर बनवले आहे. माणसाची कष्टाची कामे कमी झाली आहेत.
यामुळे हालचाल कमी होऊन याचा शरीरावर परिणाम होत आहे. कमी वयातच वेगवेगळे आजार माणसाला होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यायाम हाच एक उपाय आहे.
आज आपण पाहिले की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला कसा फायदा होतो. त्यामुळे दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो.
No comments:
Post a Comment