Thursday, 14 September 2023

संजय सोपारकर ( पारायण व अडथले )

मला बऱ्याच लोकांनी विचारले आहे की घरात आम्ही काही ही पारायण किंवा अनुष्ठान करायला घेतले की घरात लगेच क्लेश सुरू होतात...घरचे वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित होऊ लागते. घरातील लोक उगाच एक मेकांशी वाद घालू लागतात त्यामुळे वातावरण गरम होऊन लागते..छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होउ लागतात..त्यामुळे होते काय जी व्यक्ती हे अनुष्ठान करते त्याचे ही लक्ष अनुष्ठान किंवा पारायणात लागत नाही.. काही  वेळा साधकाचीही मोठ्या प्रमाणात चिडचिड होऊ लागते आणि साधक छोट्या गोष्टी वरून गरम होऊन घरातील इतर व्यक्तीच्या अंगावर धावून जाऊ लागतो...किंवा घरचे लोक साधकाच्या अंगावर धावून जातात...यासाठी अनेक लोकांनी विचारले आहे की आमचे काय चुकते आहे काय ? अध्यात्मिक कार्य घरात चालू केल्यावर घरात क्लेश कमी होण्या ऐवजी उलट वाढले आहेत..
याचे कारण सांगतो.. हे कलियुग आहे त्यामुळे काळ  प्रवाह वर कली  प्रभाव आहे. कली प्रभाव म्हणजेच नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव..जो वातावरणात भरून राहिला आहे..म्हणूनच धार्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील लोकांची पण डोके फिरून जाते .अध्यात्मिक गोष्टी करायला घेतल्या की घरातील नकारात्मक तरंग ( हल्ली हे  नकारात्मक तरंग वातावरणात सर्वत्र पसरले असतात ) मध्ये खळबळ उडून ते तरंग माणसाच्या मनात खळबळ माजवून देतात त्यामुळे घरातील सभासदांची मन बिथरून जाऊन तंटे होतात..

यावर उपाय सांगतो..घरातील लोकांनी इतर सदस्यांनी नाम स्मरण वर जास्त भर द्यावा..इतर सदस्य तसे करत नसतील तर निदान अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीने नामस्मरण वर भर द्यावा.. तसेच घरात सकाळ संध्याकाळ रुईची सुकलेली पाने घालून धूप दाखवावा..दुसरे असे जो पर्यंत अनुष्ठान किंवा पारायण चालू आहे तो पर्यंत घरी मांसाहार शिजवू नये..आता काही लोकांची तक्रार आम्ही सांगून पण घरातील लोक ऐकत नाहीत..तर त्याला आता इलाज नाही .व्यक्ती तितक्या प्रकृती. यावर उपाय एकच साधकाने घरी  मौन पालन करावे. कुणाच्याही उठाठेवित पडू नये..स्वतःचे मन प्रसन्न ठेवावे..तसेच अनुष्ठान काळात उपवास टाळावे..कारण शरीर मजबूत राहिले तरच तुम्ही अनुष्ठान करू शकाल. पूर्वीच्या काळी उपवास करत असत कारण तेव्हा माणसाला अनुष्ठान काळात पूर्ण वेळ घरी बसणे शक्य होते. आता तसे शक्य नाही. म्हणून उपवास करणे आवश्यक नाही..उपवास याचा खरा अर्थ उप+ वास म्हणजे ईश्वरा जवळ मनाने वास करणे असा आहे. तो विसरून आपण हल्ली साबुदाणा खिचडी..साबुदाणा वडा.. रताळी भाजी खाण्यात धन्यता मानतो. 
अनुष्ठान काळात फळे जास्त खावीत.. त्याने शरीरातील विष द्रव्य कमी होण्यात मदत होते तसेच मन ही शांत राहते..तसेच साधकाच्या शरीरात अनुष्ठान प्रभाव मुळे उष्णता वाढते ज्यामुळे साधक एकदम गरम होतो तो उष्णता पण फलाहार मुळे नियंत्रित राहील..पूर्वीचे ऋषी यासाठीच फलाहार वर जोर देत असत...तेव्हा साधकाने या काळात फलाहार वर जास्त भर द्यावा आणि मुख्य म्हणजे घरातील कोणत्याही भानगडीत जास्त लक्ष घालू नये. 
तसेच एक बिब्बा + एक हिरवे लिंबू + एक सुपारी  + ५ छोटे खिळे + ५ अख्ख्या म्हणजे वर फुल असलेल्या लवंग हे सर्व एका चौरस सफेद  कपड्यात  बांधून घरात बांधून ठेवावा..अनुष्ठान चे पहिल्या दिवशी हे गाठोडे अची अनुष्ठान चे जागी अर्धा तास ठेवून विघ्न दूर करण्याबद्दल प्रार्थना करावी..मग हे गाठोडे घरात कोठेही भिंतीवर खिळा ठोकून त्यावर लटकवून ठेवा..अनुष्ठान पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाहेर कचऱ्यात टाकावा. बिब्बा या फळावर कलीचे अधिष्ठान आहे असे मानले जाते..त्यामुळे नकारात्मक तरंग या वस्तू कडे आकर्षित होऊन तिथेच चिकटून राहतात.  हा उपाय फक्त अनुष्ठान काळातच करावा..

मी दिलेले नियम पाळून अनुष्ठान केल्यास ते सफल होण्यास मदत होईल..

लेखनाचे सर्व हक्क सुरक्षित आहेत...नावाशिवाय हा लेख फिरवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल..

आदेश. 

लेखक संजय सोपारकर

No comments:

Post a Comment