Tuesday, 29 November 2022

प्राणी व पक्षी आजारी का पडत नाही

.*‼️माकड कधीच आजारी पडत नाही.‼️*

कोणत्याही पक्ष्याला मधुमेह होत नाही.
कोणत्याही माकडाला हृदयविकाराचा झटका येत नाही.
कोणताही प्राणी आयोडीनयुक्त मीठ खात नाही किंवा दात घासत नाही, तरीही कोणालाही थायरॉईड होत नाही आणि त्याचे दातही खराब होत नाहीत.

माकडाच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत सर्वात जवळचा संबंध आहे. माकडात आणि माणसात फरक एवढाच असतो की माकडाला शेपूट आहे, आणि माणसाला ते नाही ,बाकी सर्व काही सारखेच आहे.

 *मग माकडाला कधीच हृदयविकाराचा झटका,मधुमेह, हाय बीपी का होत नाही ?*

माकड कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडलेच  तर ते जगत नाही मरते !

 *माकड आजारी का पडत नाही ?*

मेडिकल कॉलेजमधील एका प्रोफेसरांनी माकडाला आजारी पाडण्यासाठी खूप खोलवर संशोधन केले. त्यांनी माकडाच्या शरीरात विविध प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया सोडण्यास सुरुवात केली, कधी इंजेक्शनद्वारे, तर कधी अन्य मार्गाने ते माकडावर प्रयोग करीत होते. ते म्हणतात, मी गेली 15 वर्षे प्रयोग करतोय पण प्रत्येक वेळी मी फेल झालोय , पण माकड काही आजारी पडलेच नाही.

 *माकडाला काहीच का होऊ शकत नाही ?*

 मग एके दिवशी त्यानी हे रहस्य सांगितले, 

 *माकडाचा आरएच फॅक्टर सर्वात आदर्श आहे.*

जेव्हा एखादा डॉक्टर तुमचा RH फॅक्टर मोजतो तेव्हा तो त्याची तुलना माकडाच्या RH फॅक्टरशी करीत असतो .

*RH फॅक्टर मुळे माकडाला त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कधीही वाढत नाही, त्याचे ट्रायग्लिसराइड कधीही वाढत नाही किंवा त्याला कधीही मधुमेह होत नाही.*

 *बाहेरून त्याच्या शरीरात कितीही साखर शिरली तरी ती त्याच्या शरीरात टिकून रहात नाही.*

ते प्रोफेसर पुढे म्हणाले की, *माकडे नेहमी सकाळी लवकर पोट भरून खातात. त्यामुळे दिवसभर त्याला खूप मोठी एनर्जी मिळते आणि ते कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज रहाते.*

 *माणसाचे यापेक्षा खूप वेगळे असते. माणूस सकाळी कधीही पोटभरून जेवत नाही. तर तो नास्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करतो. त्यामुळेच माणसाला सर्व रोग होतात. सूर्योदय होताच सर्व पक्षी आणि सर्व प्राणी अन्न खातात. न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या गोष्टीत फक्त माणूस अडकला आहे. तेव्हापासून माणूस अधिक आजारी जीवन जगू लागला आहे.*

  *प्रोफेसर रवींद्रनाथ शानवाग यांनी त्यांच्या सर्व रुग्णांना सकाळी पोटभर जेवायला सांगितले. त्यांचे रुग्ण सांगतात की, आम्ही सकाळी पोटभर जेवायला सुरुवात केली तेव्हापासून आमचा मधुमेह कमी झाला, काहींचे कोलेस्टेरॉल कमी झाले, काहींची गुडघेदुखी कमी झाली, काहींच्या पाठीचे दुखणे कमी झाले, तर काहींचे गॅस मुळे पोट बिघडणे थांबले, झोप चांगली येऊ लागली…..इ..इ.*

 *हीच गोष्ट 3500 वर्षांपूर्वी वागभटजींनी सांगितली होती, ते म्हणतात की, सकाळचे जेवण हा सर्वोत्तम आहार आहे.*

सकाळी सूर्योदयाच्या अडीच तासात म्हणजे ९.३० पर्यंत, जास्तीत जास्त १० वाजेपर्यंत पोटभर जेवण केले पाहिजे.  आणि हे जेवण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही नाश्ता बंद कराल.  

*या नाश्त्याची प्रथा हिंदुस्थानी नसून ती ब्रिटिशांची देणगी आहे.*
 *रात्रीचे जेवण सूर्यास्त होण्यापूर्वी अर्ध्या पोटी खावे.  तरच तुम्ही आजारांपासून वाचाल. सकाळी सूर्य उगवण्याच्या अडीच तासात आपल्या जठराच अग्नी खूप तीव्र झालेला असतो. कारण आपले पोट सूर्याशी संबंधित आहे. आंघोळीनंतर आपली जठराग्नी  सर्वात तीव्र असते. आंघोळीनंतर पित्त वाढते, म्हणून सकाळी अंघोळ करून भोजन करावे. त्यानंतर दुसऱ्या जेवणात किमान 4 ते 8 तासांचे अंतर असावे. मध्यंतरी काहीही चटरफतर खाऊ नये आणि दिवस संपल्यानंतर अजिबात खाऊ नये.*

 *पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश असतो. ते कधीही रात्रीचे जेवण करीत नाहीत. म्हणून ते सहसा आजारी पडत नाहीत.*
*Nutritionist & Dietician*

Friday, 25 November 2022

25 नवम्बर, 2022

☀   प्रभु प्रेमी संघ   🌏
25 नवम्बर, 2022 (शुक्रवार)
 साथ उचित अवसर, नई संभावनाएँ व विकास की विविध विधाएँ भी साथ लाती हैं। अत: लक्ष्य को सर्वोपरि रखें और कठिन परिस्थितियों में शान्त, मजबूत तथा संतुलित रहने का प्रयास करें ..! सूर्य द्वारा मेघों का आवरण-तिरोहण एवं अपनी अनन्त रश्मियों से पुनः प्रकाशित होना इस बात का द्योतक है कि संघर्ष और विषमताएँ जीवन का अवरोध नहीं, अपितु मानवीय सामर्थ्य को उजागर करने वाले साधन हैं। प्रत्येक परिस्थिति में धैर्य रखें। विपरीत परिस्थितियाँ मनुष्य के सोए हुए मनोबल को जगाती हैं और उसकी दृढ़ता में बढ़ोतरी करती हैं। जो विपत्तियों से घबराता है, वह निर्बल है। विपत्तियाँ हमें सावधान करती हैं, सजग बनाती हैं। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊँचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। यदि जीवन में आत्मबल, धैर्य, साहस, पुरुषार्थ, विवेक और ईश्वर आश्रय हो तो हरेक परिस्थिति में विजय प्राप्त कर निरन्तर प्रगति के पथ पर आगे बढ़ा जा सकता है। वास्तव में सफल वही है जो विषम परिस्थितियों और अड़चनों में भी प्रसन्न रहे, स्वस्थ रहे, जीवन का संतुलन न खोए और अपने आदर्शों को न छोड़े। एकाग्रता, प्रसन्नता व पवित्रतापूर्वक पुरूषार्थ करते हुए वर्तमान में जीना और हर परिस्थिति में समभाव रखना ही 'योग' है। अतीत का शोक, वर्तमान की आसक्ति और भविष्य के भय को त्याग कर पूर्णरूपेण कर्मशील व सात्विक जीवन ही हमारी सर्वोपरि प्राथमिकता होनी चाहिए, क्योंकि यही हमारे स्वास्थ्य का प्रमुख आधार बनेगी ...।

  हमारे उत्थान की नींव के लिए हमारे भूतकाल, वर्तमान और भविष्य के बीच आपसी सम्बन्ध और निष्ठा आवश्यक है। कठिनाईयों के समय अपने लक्ष्यों का पीछा करना न छोड़ें। कठिनाईयों को अवसरों में बदले। यदि आप दृढ़ संकल्प और पूर्णता के साथ काम करते हैं, तो सफलता आपका पीछा करेगी। अवसर आपके चारों ओर हैं, इसलिए इन्हें पहचानिए और इनका लाभ उठाइए। बड़ा सोचिये, दूसरों से पहले सोचिये और जल्दी सोचिये, क्योंकि विचारों पर किसी एक का अधिकार नहीं है। राग और द्वेष से मुक्त बनकर समता भाव धारण करना चाहिए। जहाँ शंका होती है, वहाँ श्रद्धा नहीं होती। जहाँ श्रद्धा होती है वहाँ शंका नहीं रह सकती। ईश्वर है या नही, हमने कभी देखा नही। इस प्रकार की शंकाएँ व्यक्ति की श्रद्धा को भ्रष्ट करती है। परमेश्वर परमात्मा को हृदय में धारण करना, हर पल उनका स्मरण करना, प्रतिदिन उनके दर्शन-पूजन करना, यह हमारी आर्य संस्कृति है। उन्नति और विकास का मार्ग कठिनाइयों के कंकरीले पथ से ही जाता है। जो व्यक्ति जीवन में कठिनाइयों से घबराता है उसे उन्नति की आकाँक्षा नहीं करनी चाहिए। उन्नति का अर्थ ही ऊंचाई है, जिस पर चढ़ने के लिये अधिक परिश्रम करना पड़ता है। दिन और रात के समान सुख-दु:ख का कालचक्र सदा घूमता ही रहता है। जैसे दिन के बाद रात्रि का आना अवश्यम्भावी है, वैसे ही सुख के बाद दुःख का भी आना अनिवार्य है। दुःख भी एक तरह की परीक्षा होती है। जैसे स्वर्ण अग्नि में तपकर अधिक सतेज बनता है, वैसे ही धैर्यवान मनुष्य विपत्तियों का साहस के साथ सामना करते हुए जीवन संग्राम में 'विजय' प्राप्त करता है ...।
**********

Thursday, 24 November 2022

शेवटचा निरोप

शेवटचा निरोप देण्या करता
अन अखेरची भेट घेण्या करता
आज संपूर्ण गोतावळा जमला 
आयुष्यभर काय कमवल
ह्याच उत्तर आज गवसल 
आज कसलाच तान न्हवता 
कसलीच चिंता न्हवती 
माझा माघारी काय होईल ह्याची काळजी न्हवती 
नियतीचा खेळाला कोण चूकल होत 
मी मात्र आज मृत्यूच्या छायेतून 
मिश्कीलपणे हस्त हे सारं अनुभवत होतो
अनंतात विलीन होण्याची तयारी सुरू होती 
जो कुणी आला तो 
शब्दांजली पुष्पांजली अर्पण करत होता
जिवंत असेपर्यंत कुणी फुलाची पाकळी पण दिली नाही 
आज मात्र गुलाबाचा फुलांचा वर्षाव केला 
काही ओळखीचे मी कसा होतो 
हे एकमेकांना सांगत होते 
मित्र मंडळी जुन्या आठवणीत मला हुडकत होते 
नात्यातले जवळचे लोक 
ढसा ढसा रडत होते 
शेजारी पाजारी अखेरच्या निरोपाची तयारी थाटात करत होते 
येवढं गोतावळ आजवर लग्न बारस वाढिवसानिमित्त पण जमल नाही 
तेवढं आज शेवटचा निरोप देण्या करता जमल होत 
आई मात्र आज हंबरडा फोडून रडत होती 
पोरांनी रडून तुफान आणल होत 
देवाला संतप्त होऊन शिव्यांनी हाणल होत
बायकोने मात्र आज कोपराच गाठला 
भुणभुण सोडून मौनव्रत धरला 
बहीण प्रेमाने म्हणाली आजवर प्रतेक हट्ट पुरवला 
आज अजून एक हट्ट पूर्व चटकन उठून पटकन कुशितघे 
भाऊ रडत रडत आधार हिरवला अस म्हणत डोक्यावर हात फिरवू लागला.
जो तो आपापल्या परीने आधार देत होता 
चार खांद्यावर मला शेवटचा निरोप दिला 
माझा अनंतात विलिन होण्याचा समारंभ थाटात पार पडला.

कॅल्शिअमच खजाना.! रात्रंदिवस दुखणारे गुडघे कायमचे थांबले.! गुडघ्याच्या दुखणाऱ्या वाट्या बऱ्या करण्यासाठी हे एक काम करायलाच हवे.!

मित्रांनो आपण निसर्गाच्या गाभार्यात वास करतो. आपले शरीर सुद्धा एक नाशवंत नैसर्गिक घटक आहे. आपल्या परिसरात आज काल मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत चालले आहे. या वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे वाढणारी लोकसंख्या व त्यांना राहण्यासाठी केली जाणारी वृक्ष तोड व जंगल तोड. परिसरात झाडे कमी होवू लागली आहेत व सर्वत्र प्राणवायू कमी होवून प्रदूषणाचे काळे ढग वाढत आहेत.

त्यामुळे आता आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सोबतच आपली रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी होत चालली आहे. आता या पृथ्वीवर असा एक ही मानव नाही जो संपूर्ण रोग मुक्त आहे. ज्याला कसला ही आजर नाही, विकार नाही तसेच दुखणे देखील नाही. दवाखान्यात गेल्यास डॉक्टर तुम्हाला बरे करतात परंतू त्यासोबत विविध प्रकारच्या कृत्रिम गोळ्या औषधे देतात.

नेहमी म्हणजेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा पित्ताचा विकार असतो त्यांना रोज गोळ्या व औषधे खावी लागतात. आज कालची सामान्य समस्या म्हणजे गुढगे दुखी व सांध्यांचे दुखणे. आज अनेक लोक या आजाराने पिडीत आहेत. मात्र रोज गोळ्या व औषधे ग्रहण केल्यास तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर यांचा वाईट परिणाम होतो. सोबतच प्रत्येक महिन्याला पगारातील मोठी रक्कम या गोळ्या व औषधांवर खर्च होते.

आपल्या प्रकृतीमध्ये असे एक औषध आहे जे तुमच्या शरीरातील दुखण्यांना समूळ नष्ट करण्याची ताकद ठेवते. होय आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला अश्या एका औषधा बद्दल सांगणार आहोत जो आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदात देखील या औषधा बद्दल सविस्तर नमूद केलेले आहे. मात्र अनेक जणांना या चमत्कारीक औषधा बद्दल माहिती नाही.

आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगत आहोत ते तुमचे जीवन बदलून टाकू शकते म्हणून आम्ही दिलेली ही माहिती अगदी शेवट पर्यंत नक्की वाचा. शीशमचे झाड तुम्हाला माहितच असेल. शीशम अत्यंत महाग आहे. शीशम एक मजबूत व आता दुर्लभ वृक्ष आहे. याचे लाकूड खूप मजबूत व टिकावू असते. म्हणूनच या लाकडापासून मोठ मोठे दरवाजे व खिडक्या मध्ययुगीन राजा-महाराजांनी बनवून घेतल्या होत्या.

आता देखील शीशम बाजारात खूप महाग परंतू एक उच्च दर्जेदार लाकूड आहे. याच शीशम झाडाची पाने अत्यंत गुणकारी आहेत. होय ज्या औषधा बद्दल आम्ही बोलत होतो ते हेच शीशम झाडाची पाने आहेत. ही पाने अनेक रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. चला या शीशमच्या पानांनी होणारे फायदे जाणून घेऊया. शरीराचे दुखणे दूर करण्यासाठी सर्व प्रथम शीशम वृक्षाची सात ते आठ पाने घ्या.

वापरण्या आधी यांना पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. नंतर यांना एका पात्रात टाका. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो म्हणजे राईचे तेल. राईचे तेल आपल्या मानवी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. सोबतच हा एक नैसर्गिक वेदना शमाक आहे. या राईच्या तेलाला आता या भांड्यात टाका. तीसरा घटक आता मेथीचे दाणे देखील या भांड्यात टाकायचे आहेत.

या नंतर हे मिश्रण गॅसवर गरम होण्यास ठेवा. या भांड्यावर झाकण ठेवण्यास मात्र विसरु नका. दहा ते पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा व दोन तास हे मिश्रण असेच थंड होण्यास ठेवा. या नंतर गाळणीच्या मदतीने याला गाळून एका काचेच्या भांड्यात ठेवा. जेव्हा तुम्हाला गुढगे दुखी अथवा सांधेदुखी होईल तेव्हा हे तेल त्या भागांना लावा व मालिश करा याने तुमचे दुखणे त्वरित बरे होईल.

Friday, 6 January 2017

Friday, 30 December 2016

आयुर्वेदिय उपचार

आयुर्वेदीय

तक्रार :- ताप येणे

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति चंद्रकला वात विध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस काली मूर अ‍ॅकोनाईट
अ‍ॅलोपॅथी :-
क्रोसिन गोळ्या किंवा कोसिन सायरप
घरगुती उपाय :-
कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा वा काढा गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे यांचा काढा.

तक्रार :- सर्दी

आयुर्वेदीय :-
त्रिभुवन कीर्ति, सूक्ष्म त्रिफला, भल्लातकासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस, नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
बेनेड्रिल
घरगुती उपाय :-
आल्याचा रस + गूळ गोळी करून मिऱ्याची पूड + गूळ दह्यांतून

तक्रार :- खोकला

आयुर्वेदीय :-
अनंद भैरव रस सितोपलादि चूर्ण, कायारि वटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्फेरिआ फॉय नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लायकोडिन बेंझोसिन
घरगुती उपाय :-
लंवगेचे चाटण, ज्येष्ठमधाचे चाटणा जिरे व साखर तोंडात धरणे, पिंपळी + काकडशिंगी

तक्रार :- जुलाब

आयुर्वेदीय :-
संजीवनई कुटजारिष्ट शंखोदर अतिविषादि चूर्ण
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्र्म फॉस नक्स व्होमिका
अ‍ॅलोपॅथी :-
सल्फागॉनडिन एन्ट्राव्हायोफॉर्म
घरगुती उपाय :-
सुंठ + जायफळाचे चाटण वेलफळाचा मोरंबा, कुड्याचे पाळ ताकातून.

तक्रार :- आव (रक्त पडत नसेल तर)

आयुर्वेदीय :-
संजीवनी कुट जारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर मॅग्नेशियम फॉय
अ‍ॅलोपॅथी :-
मेट्रोजिल
घरगुती उपाय :-
मिरा + लसूण तूपांतून गोळी बडीशेप + सुंठ + आवळकाठी यांचे साखरेतून चूर्ण

तक्रार :- उलट्या

आयुर्वेदीय :-
प्रबाळ पंचामृत सूतशेखर
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
इपिकॅक्यूना नक्यहोमिका नेट्रम मूर काली मूर
अ‍ॅलोपॅथी :-
स्टेमेटिल
घरगुती उपाय :-
मोरावळा, आले-लिंबाचे चाटण, महाळुंगपाक

तक्रार :- तोंड येणे

आयुर्वेदीय :-
कामादुहा-दुधातून तोंडाला लावणे
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली मूर लावण्यासाठी नेट्रममूर पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
ग्लिसरिन बोरॅक्स
घरगुती उपाय :-
जाईच्या पाल्याचा रस, मधांतून तोंडाला लावणे. संगजिऱ्याची पूड.

तक्रार :- पोटदुःखी आम्लपित्त कळ येऊन

आयुर्वेदीय :-
प्रवाळ पंचामृत सूतशेखर शंकवटी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
नेट्रम सल्फमॅगेनिशयम फॉस मिलिका
अ‍ॅलोपॅथी :-
झायमेट डॉयव्हाल स्पेंशिनडॉन-बॅर-ल्गन्‌
घरगुती उपाय :-
भाजलेला चिंचोका चावून खावा. मोरावळा, ओवा, खायचा सोडा +लिंबू

तक्रार :- जंत कृमि

आयुर्वेदीय :-
कृमिमुरगर रस विडंगारिष्ट
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :- सीना
अ‍ॅलोपॅथी :- हेल्मासिड, अ‍ॅडल्फिन इबेन
घरगुती उपाय :- वावडिंगाचे चूर्ण मधातून कपिल्लाची गोळी गुळातून

तक्रार :- सांधे दुखी

आयुर्वेदीय :-
सिंहनाद गुग्गुळ वातविध्वंस आर कंपाऊंड
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस, मॅग्नेशियम फॉस, काली सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
ब्रुफेन
घरगुती उपाय :-
सुंठीचा काढा, एरंडेल निरगुडीच्या पाल्यांचा शेक

तक्रार :- मूत्र विकार

आयुर्वेदीय :-
चंद्रप्रभा, गोक्षुरादि गुग्गुळ पुनर्मवासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
अल्फानाइन मिक्चर
घरगुती उपाय :-
धने जिऱ्याचे पाणी वाळ्याचे सरबत गोखरूचा काढा

तक्रार :- रक्तस्त्राव (पाळीच्या वेळी परसाकडण्यातून, लघवीवाटे )

आयुर्वेदीय :-
कोहळ्याचे पाणी चंद्रकला बोलबद्ध रस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरम फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व
घरगुती उपाय :-
लोणी + साखर, आवळकाठीचे चूर्ण

तक्रार :- मानसिक व्यथा ( झोप न येणे, चिंता )

आयुर्वेदीय :-
ब्राह्मीप्राश, अश्वगंधरिष्ठ, सारस्वतारिष्ठ, उन्मादगज केसरी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली फॉस कल्केरिआ फॉस
अ‍ॅलोपॅथी :-
काम्पोज
घरगुती उपाय :-
वेखंडाची पूड हातापायास चोळणे कांद्याची दह्यातील कोशिंबीर

तक्रार :- पित्त उठणे, अ‍ॅलर्जी

आयुर्वेदीय :-
सूतशेखर आल्याच्या रसातून चंद्रकला + आरोग्यवर्धिनी
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
हिपार सल्फ
अ‍ॅलोपॅथी :-
इन्सिडाल एव्हिल
घरगुती उपाय :-
अमसुलाचे पाणी

तक्रार :- भाजणे, पोळणे

आयुर्वेदीय :-
शतधौत धूत
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कन्येरिस मलम
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल
घरगुती उपाय :-
तूप लावणे

तक्रार :- मुरगळणे लचकणे

आयुर्वेदीय :-
लेप गोळी पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
अर्निका मलम पोटात अर्निका
अ‍ॅलोपॅथी :-
आयोडेक्स पोटात रिड्युसिन
घरगुती उपाय :-
रक्तचंदन, तुरटी, हळद यांचा लेप

तक्रार :- जखमा

आयुर्वेदीय :-
शोअधन तेल लावणे, पोटात सूक्ष्म त्रिफळा गंधक रसायन
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कॅलेंडुला मलम, कल्केरिआ सक्फ पोटात
अ‍ॅलोपॅथी :-
बर्नाल, जोनसनच्या पट्ट्या, पोटात सल्फा गोळ्या
घरगुती उपाय :-
स्वच्छ खोबरेल तेल

तक्रार :- दातदुखी

आयुर्वेदीय :-
लवंगेचे तेल पोटात वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
फेरमफॉस मॅग्नेशियम फॉस कल्केरिआ फ्लूर
अ‍ॅलोपॅथी :-
लांग तेलाचा बोळा, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
तुपाचा बोळा

तक्रार :- कानदुखी

आयुर्वेदीय :-
सब्जाचे किंवा तुळशीचे तेल कानात घालणे, पोटात यू त्रिफला वातविध्वंस
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
काली सल्फ नेट्रम मूर
अ‍ॅलोपॅथी :-
वॅक्सोल्व कानात घालणे, पोटात क्रोसिन
घरगुती उपाय :-
लसणीचे तेल कानात घालणे

तक्रार :- कातडीचे सामान्य विकार ( त्वचा रोग )

आयुर्वेदीय :-
आरोग्यवर्धिनी, गंधक रसायन सारिवाद्यासव
बाराक्षार किंवा होमिऔषेधी :-
कल्केरिआ फॉस नेट्रम सल्फ
अ‍ॅलोपॅथी :- ...
घरगुती उपाय :-
हळदीचा लेप गोमूत्रातून पोटात हिरडा उगाळून तुळशीचा रस लावण्यासाठी

shatavari


शतावरी

      
शतावरी ही एक काटेरी, आरोहिणी वेल आहे. हिची पाने बारीक असून सुरुच्या पानासारखी असतात. फाद्यावर साधारणपणे १ सें. मी. लाबीचे वाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. पाने २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारे २ ते सें. मी. पर्यंत लांब असतात. फुले पांढन्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाठाण्याच्या आकाराचे असून त्यामध्ये एक किंवा दोन बिया मिन्यच्या आकाराच्या असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल  असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे.

शतावरीला शास्त्रीय परिभाषेत Asparagus racemosus असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी बी मुळची भारतीय असून उष्ण व समशितोष्ण कटिबंधात समुद्र सपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढतांना दिसते.

आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे.  त्याला भातीची शतावरी असे म्हणतात. यालाचा शास्त्रीय परिभाषेत Asparagus officinalis असे म्हणतात. अमेरिकेतील कँलिफोर्निया, फ्रांसमधील मिलील फोर्ट, चीनमधील तायवान, जपान वगैरे देशात अँस्परागस भाजी प्रचारात आहे. अँस्परागसची  लागवड पूर्वीपासून काशमीर, भुतान या थंड प्रदेशात प्रचलीत आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटँमीन ए व सीस पोटँशियम, रायबोफ्लेवीन व थायमीन ही ओशधी तत्वे आहेत. या कोंबापासून चविष्ट असे सुप तयार केले जाते. मेरी वाँशिंग्टन ह्गा जातीची आपल्याकडे शिफारस केली जाते.

उपयोगः  
औशधी उपयोगी शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफ्लेवीन, थायमीन, पोटँशियम, कँलशियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृध्दी, मुतखडा,, अपस्मार रक्तशुध्दी यासाठी केला जातो. स्त्रियांसाठी शतावरी इतके दुसरे उत्तम औषध नाही. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशी मध्ये जास्त दूध देण्यासाठी केला जातो. शोभेचे झाड म्हणून सुध्दा शतावरी घरोघरी लावलेली दिसते. शतावरी कल्प शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. हा कल्प दुधातून नियमीत घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधीवातावक गुणकारी आहे. शतावरी वाढलेला रक्तदाब कमी करीत असल्याने हृदय रोगात वापरतात. तसेच ही स्मृतीवर्धक कार्य करते. स्त्रियांमध्ये सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.

आधार: शेती फायद्याची औषधी सुगंधी वनस्पती-(फेब्रुवारी-२००५), डाँपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला


एक विचार

·         उपास-तापासनवस आणि जागरणांचा ’सीझन’ आहेजो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहेकुणी बाबांच्या वाऱ्या करताततर कुणी दर्शनाचा अतिरेक करतातउपासाच्यानावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातातजागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातातआवडीच्या गोष्टी सोडणेमंदिरांना दान देणे,आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होतेया सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवेकाहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातोअसेचभिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतोगाडीबंगलाचांगली नोकरी... ही यादी संपत नाहीमात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जातेआपले कुटुंब,ऑफिसमधील सहकारीमुलेमित्रपरिवारनातेवाईकग्राहक यांच्या मनाचाविचारांचागरजांचा विचार करायला वेळच उरत नाहीदगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेलामनुष्य जिवंत जीवांना विसरून जातोअशाने देव अजिबात खूश होत नाहीदुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसाघरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायलादोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास रांगा लावतातयाला भक्ती म्हणत नाहीतस्वामी विवेकानंदांनी म्हटले तेच खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळासर्वांशी प्रेमाने वागाजगावर थोडा विश्वास ठेवाही खरी पूजाचार वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतातदोन दु:खदप्रसंग घडले कीनशीब खोटे वाटू लागतेनजर जाईल तिथे खोटेपणालबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होतेमनात कपटद्वेषशंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजानसून वेडेपणाच आहेस्वच्छशांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पायाबाकी सगळे नंतरइमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेलपण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना.पूजाउपासनवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहेअत्यंत देखणा आहेपण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्यावाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याहीदेवळात गेलातकितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणारबनवणाऱ्याला चालवता येतेदेवाकडे ’करप्शन’ हा प्रकार चालत नाहीतिथे लाचदेऊन चांगले आयुष्य घेता येत नाहीतिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.देवाने बनवलेल्या सृष्टिवर  त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्यादेव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?