Thursday, 24 November 2022

शेवटचा निरोप

शेवटचा निरोप देण्या करता
अन अखेरची भेट घेण्या करता
आज संपूर्ण गोतावळा जमला 
आयुष्यभर काय कमवल
ह्याच उत्तर आज गवसल 
आज कसलाच तान न्हवता 
कसलीच चिंता न्हवती 
माझा माघारी काय होईल ह्याची काळजी न्हवती 
नियतीचा खेळाला कोण चूकल होत 
मी मात्र आज मृत्यूच्या छायेतून 
मिश्कीलपणे हस्त हे सारं अनुभवत होतो
अनंतात विलीन होण्याची तयारी सुरू होती 
जो कुणी आला तो 
शब्दांजली पुष्पांजली अर्पण करत होता
जिवंत असेपर्यंत कुणी फुलाची पाकळी पण दिली नाही 
आज मात्र गुलाबाचा फुलांचा वर्षाव केला 
काही ओळखीचे मी कसा होतो 
हे एकमेकांना सांगत होते 
मित्र मंडळी जुन्या आठवणीत मला हुडकत होते 
नात्यातले जवळचे लोक 
ढसा ढसा रडत होते 
शेजारी पाजारी अखेरच्या निरोपाची तयारी थाटात करत होते 
येवढं गोतावळ आजवर लग्न बारस वाढिवसानिमित्त पण जमल नाही 
तेवढं आज शेवटचा निरोप देण्या करता जमल होत 
आई मात्र आज हंबरडा फोडून रडत होती 
पोरांनी रडून तुफान आणल होत 
देवाला संतप्त होऊन शिव्यांनी हाणल होत
बायकोने मात्र आज कोपराच गाठला 
भुणभुण सोडून मौनव्रत धरला 
बहीण प्रेमाने म्हणाली आजवर प्रतेक हट्ट पुरवला 
आज अजून एक हट्ट पूर्व चटकन उठून पटकन कुशितघे 
भाऊ रडत रडत आधार हिरवला अस म्हणत डोक्यावर हात फिरवू लागला.
जो तो आपापल्या परीने आधार देत होता 
चार खांद्यावर मला शेवटचा निरोप दिला 
माझा अनंतात विलिन होण्याचा समारंभ थाटात पार पडला.

No comments:

Post a Comment